पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'राष्ट्रवादीला नॅनोपार्टी केल्याशिवाय थांबणार नाही'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानसभा निवडणूक प्रचाराला अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाकडू जोरदार प्रचार सभा सुरु आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे बारामती मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या सभे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. 'शरद पवारांसोबत एकही पैलवान रहायला तयार नाही. अशी राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था झाली आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसला नॅनो पार्टी केल्याशिवाय राहणार नाही', अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

भाजपवाले इतिहासही बदलतील म्हणून त्यांना सत्तेपासून दूर ठेवा - पवार

या निवडणूक प्रचारा दरम्यान पैलवानाच्या मुद्द्यावरुन शरद पवार आणि मुख्यमंत्री एकमेकांवर टीका करत आहेत. 'पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणी रहायला तयार नाही. पवारसाहेब म्हणाले मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. मी अनेक पैलवान तयार करतो. पण एकही पैलवान तुमच्या सोबत राहत नाही याचे कारण काय? आज महाराष्ट्रात दाखवायला एकही पैलवान उरला नाही.  सगळ्या मतदारसंघात तुम्हालाच जावे लागते ही अवस्था तुमच्या पक्षावर का आली? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी पवारांवर टीका केली.

PMC: खातेधारकांना हायकोर्टात जाण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश

दरम्यान, 'लोकसभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस नॅनो पार्टी बनेल असे सांगितले होते. त्यांचे फक्त चारच उमेदवार निवडून आले. मागच्यावेळी थोडी नॅनो होता होता राहिली यावेळी ती कसर आपण भरुन काढणार आहोत. नॅनो गाडीत जेवढे लोकं बसतात तेवढेच लोकं यांचे निवडून येणार आहेत. अशा प्रकारची नॅनोपार्टी राष्ट्रवादी काँग्रेसची केल्याशिवाय आपण थांबणार नाही', अशी टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. 

विश्वास ठेवू नका, १००० रुपयांच्या नोटेचे व्हायरल झालेले फोटो खोटे