पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'खरा पैलवान कोण हे २४ तारखेला जनता दाखवेल'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  जळगावमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा होत आहे. या सभे दरम्यान भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'खरा पैलवान कोण हे येत्या २४ तारखेला जनता दाखवेल', असे प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना दिले आहे. 

जगात सर्वांधिक सुखी मुसलमान भारतात, कारण..: मोहन भागवत

'शरद पवारांची स्थिती राहुल गांधी यांच्यापेक्षा वाईट झाली आहे. पवारांच्या पक्षात रहायला सध्या कोणीही तयार नाही अशी अवस्था झाली आहे', असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसंच, यावेळी त्यांनी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवर आणि पवारांच्या हातवाऱ्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे. 'पराभव समोर दिसू लागला की माणसाची विवेकबुध्दी कमी होऊ लागते. आम्ही नटरंगसारखे काम करत नाही. अशाप्रकारे हातवारे आम्ही करु शकत नाही', असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

'भारतीय अर्थव्यवस्था एका व्यक्तीच्या मर्जीवर चालू शकत नाही'

दरम्यान, त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना राहुल गांधी परदेशी गेले होते. यावरुन मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. 'नेता बँकॉकला आणि कार्यकर्ते महाराष्ट्रात. राहुल गांधी नक्की कुठे आहेत?', असा सवाल त्यांनी यावेळी विचारला आहे. तसंच, 'बंडखोरांवर लक्ष देऊ नका, कमळ आणि शिवसेना या चिन्हावरचंच बटण दाबा', असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी जनतेला केले आहे. 

मरिन ड्राईव्ह येथे मॉर्निंग वॉकद्वारे मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद