पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभा निवडणूक प्रचाराचा धडाका सुरु; 'या' ठिकाणी होणार दिग्गजांच्या जाहीर सभा

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (photo: Bachchan Kumar)

विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाने आपली ताकद पणाला लावून जोरदार प्रचाराचा धडका सुरु केला आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते इतर पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या सोमवारी राज्यभर जाहीर सभा होणार आहे. या सभांच्या माध्यमातून मतदानापूर्वी जास्तीत जास्ती नागरिकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांकडून सुरु आहे. 

मोदी_परत_जा अन् राहुल लय भारी! ट्रेंडिंगमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज अमरावती आणि यवतमाळ या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. या सभे दरम्यान मुख्यमंत्री पोहरादेवीचे दर्शन देखील घेणार आहेत. तसंच बंजारा समाजाचे धर्मगुरु रामराव महाराज यांची भेट घेणार आहेत. या दोन्ही ठिकाणी होणाऱ्या सभांदरम्यान मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

'महापुरात स्थानिक मदतीला धावले अन् सरकारने श्रेय लाटले'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यामध्ये तोफ धडाडणार आहे. मागच्यावेळी पावसामुळे राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द करण्यात आली होती. मात्र आज राज ठाकरे पुणेकरांशी प्रचार सभेच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. त्याचसोबत राज ठाकरे यांची यवतमाळ येथे देखील जाहीर सभा होणार आहे. 

'सत्ताधाऱ्यांची मस्ती उतरवण्यासाठी खंबीर विरोधी पक्षाची गरज'

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या देखील उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये ७ जाहीर सभा होणार आहे. परांडा, बार्शी, मोहळ, सांगोला आणि करमाळा याठिकाणी त्यांच्या जाहीर सभा होणार असून या माध्यमातून ते मतदारांशी संवाद साधणार आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची औरंगाबाद आणि अहमदनगर येथे जाहीर सभा होणार आहे. 

'PMC बँक घोटाळ्यात कुणाचे नातेवाईक? मोदींनी उत्तर द्यावे'