पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजित पवारांची क्लीन चिट योगायोग, शंका घेऊ नका, खडसेंचा टोला

भाजप नेते एकनाथ खडसे

सिंचन घोटाळ्याचा आरोप असलेले अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद दिल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना रुचल्याचे दिसत नाही. त्यांनी त्यावर थेट न बोलता अप्रत्यक्षरित्या पक्षनेतृत्वावर निशाणा साधला आहे. अजित पवारांचे अचानक भाजपसोबत येऊन उपमुख्यमंत्री होणे, देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री होऊन सोमवारी कार्यालयात पहिले पाऊल ठेवणे. त्याच क्षणी अजित पवारांच्या चौकशीच्या फाइल बंद होऊन त्यांना क्लीन चिट मिळणे हे जनतेच्या दृष्टीने हेतुपुरस्सर आहे का? अशी शंका येण्यासारखे असले तरी तसे काहीही नाही. हा विलक्षण योगायोग आहे, त्याकडे संशयाने पाहिले नाही पाहिजे,' अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

शबरीमला मंदिरात प्रवेश केलेल्या बिंदूंवर मिरची पावडर फेकली

ते म्हणाले, राजकारणाची पातळी घसरली आहे. मतदारांत सर्वच पक्षांच्या राजकारण्यांविषयी प्रचंड चीड आहे. मतदार तर राजकारण्यांकडे चांगल्या नजरेने पाहत नाहीत. सध्या महाराष्ट्रात जे सुरू आहे त्याबाबत न बोललेलेच बरे. केवळ आरोप होते म्हणून मी नैतिकता पाळून राजीनामा दिला होता. आरोप होते म्हणून खडसे चालले नाहीत. राजकारणातील नैतिक मूल्ये हरवली आहेत याची मला खंत वाटते. 

अजित पवार हेच गटनेते, जयंत पाटलांचा फक्त प्रतिदावा-शेलार

दरम्यान, भाजपचे नेते आशिष शेलार यांनी अजित पवार हेच गटनेते असल्याचा दावा केला. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते म्हणून दोन वेळा राज्यपाल भवनाशी संवाद साधला आहे. त्यांचे पत्र राज्यपाल भवनात आहे. पत्राच्या आधारेच राज्यपाल भवनने निर्णय दिला असल्याचे शेलार म्हणाले. जयंत पाटील यांची गटनेतेपदी नोंद नाही, असेही त्यांनी सांगितले.

नितीन गडकरी शहाणे राजकारणी वाटत होते, शिवसेनेचा टोला