पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागपूरात रोड शो : युती नवा विक्रम रचणार, मुख्यमंत्र्याचा विश्वास

मुख्यमंत्र्यांचा नागपूरात रोड शो

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. प्रचार संपायला आता अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे शेवटच्या काही तासांत प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळली आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोडशोला नागपूरात सुरूवात झाली आहे.  या विधानसभा  निवडणुकीत युतीचा विजय होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी रोड शो दरम्यान व्यक्त केला आहे.

विधानसभा निवडणूक : प्रचार तोफा आज थंडावणार, आता वेध मतदानाचे

दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघातून मुख्यमंत्री निवडणूकीच्या रिंगणात आहेत. पत्नीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोडशोमध्ये सहभागी झाले आहे. येत्या २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात मदतान होणार आहेत. तर २४ ऑक्टोबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या या मतदार संघात दोन सभा झाल्या आहेत.

तुरुंगाऐवजी रमेश कदम ठाण्यातील फ्लॅटमध्ये, तिथूनच लाखोंची रोकड जप्त

या विधानसभा  निवडणुकीत युतीचा विजय होईल, महाराष्ट्रात युती नवा विक्रम रचेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी रोड शो दरम्यान व्यक्त केला. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Chief Minister Devendra Fadnavis holds roadshow in Nagpur on the last day of campaigning for assembly elections