पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या हर्षवर्धन जाधवांविरोधात गुन्हा दाखल

हर्षवर्धन जाधव

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कन्नड तालुक्याततील पिशोर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी प्रचार सभेदरम्यान उध्दव ठाकरे यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली होती. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेकडून तीव्र निषेध करण्यात आला होता. 

बंडखोर तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी

हर्षवर्धन जाधव हे शिवसेनेचे आमदार होते. मात्र मराठा आरक्षण आंदोलनावेळी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. आता ते कन्नड मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकिच्या रिंगणात उतरले आहे. त्यांनी प्रचार सभेदरम्यान उध्दव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्या औरंगाबाद येथील घरावर हल्ला करण्यात आला होता. तसंच दगडफेक करत त्यांचे घराचे आणि गाड्यांचे नुकसान करण्यात आले होते. या घटनेचा हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या पत्नी संजना यांनी निषेध केला होता. 

आदित्य ठाकरेंचा वरळीत मॉर्निंग वॉकद्वारे प्रचार