ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाविषयी जाहीर नाराजी बोलून दाखवली आहे. पक्ष सोडण्याची माझी इच्छा नाही, मात्र काही गोष्टी अशाच सुरू राहिल्या तर मी दीर्घकाळ पक्षात टिकणार नाही, असा धमकीवजा इशाराच संजय निरुपम यांनी दिला आहे.
'शरद पवार माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवताहेत'
गुरुवारी ट्विटद्वारे संजय निरुपम यांनी पक्षश्रेष्ठींविरोधात जाहीर नाराजी बोलून दाखवली होती. संजय निरुपम यांनी सुचवलेल्या उमेदवाराला तिकीट देण्यात आलं नाही, यामुळे निरुपम नाराज झाले होते. 'विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईमधून मी एकच नाव सुचवलं होतं, मात्र त्या नावाचा विचारच केला गेला नाही असं माझ्या कानावर आलं. आता मी पक्षाच्या प्रचारात सहभागी होणार नाही, हा माझा अंतिम निर्णय असल्याचं मी पक्षश्रेष्ठींना कळवलं आहे', असंही निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
भाजपतील वाद चव्हाट्यावर, पराग शहांच्या गाडीवर मेहतांच्या समर्थकांचा हल्ला
त्यानंतर शुक्रवारी पत्रकार परिषदेत घेत त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठीविरोधात नाराजी व्यक्त केली. मला हा पक्ष सोडायचा नाही. मात्र पक्षाची वर्तणूक अशीच राहिली तर मी या पक्षात दीर्घकाळ राहणार नाही. मी निवडणुकीच्या प्रचारात भाग घेणार नाही असं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात मुंबई काँग्रेसमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर संजय निरुपम यांना मुंबई अध्यक्षपदावरून हटवून मिलिंद देवरा यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र महिन्याभरापूर्वी मिलिंद देवरा यांनी देखील राजीमाना दिला होता.