पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस उमेदवाराच्या नावाचे टी-शर्ट घालून तरुणाची आत्महत्या

नाल्यात पडून मुलाचा मृत्यू

बुलढाण्यामध्ये तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या धाड गावात ही घटना घडली आहे. सतिश मोरे (२१ वर्ष) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाने चिखली मतदार संघातील काँग्रेस उमेदवार राहुल बोन्द्रे यांच्या नावाचे टी शर्ट घातले आहे. या घटनेमुळे धाड गावात एकच खळबळ उडाली आहे. 

'शिवाजी महाराजांचे संस्कार आमच्यासोबत होते आता परिवारही आहे'

सतीश मोरे बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. गावातील एका हॉटेलमध्ये सतिश चिवडा तयार करण्याचे काम करायचा. सतीश घरी न आल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी आणि गावातील तरुणांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो कुठेच सापडला नाही. गुरुवारी सकाळी गावातील दूध डेअरीच्या जवळ असलेल्या एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत सतिशचा मृतदेह सापडला. 

काँग्रेस-राष्ट्रवादीने लोकांना गाळात घातले, उदयनराजे कडाडले

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सतिशचा मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सतिशने आत्महत्या का केली याचे कारण मात्र अस्पष्ट आहे. मात्र सतिशने चिखली मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार आमदार राहुल बोन्द्रे यांचे 'मी राहुलभाऊ समर्थक' नावाचे टी शर्ट घालून आत्महत्या केली आहे. त्यामुळे धाड गावासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

काँग्रेस सावरकर विरोधी नाही : मनमोहन सिंग