पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निवडणुकीवर बहिष्कार टाका; नक्षलवाद्यांनी झळकावले बॅनर्स

नक्षलवाद्यांचे पत्रक

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहे. आज गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रचार सभा होणार आहे. या प्रचार सभेच्या पार्श्वभूमीवर नक्षली पत्रकं सापडली आहे. यामध्ये नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. 

सीजे हाऊस व्यवहार प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून चौकशी

अमित शहा यांची आलापल्ली येथे प्रचारसभा होणार आहे. या प्रचारसभेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीमध्ये कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अमित शहांच्या प्रचारसभेच्या पार्श्वभूमीवर भामरागड तालुक्यातील भामरागड - लाहेरी मुख्य मार्गावरील मौजा मल्लमपोडूर इथे नक्षलवाद्यांनी पत्रकं आणि बॅनर लावले आहेत. २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाका. तसंच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपसह सर्व राजकीय पक्षांवर देखील बहिष्कार टाका, असे आवाहन या बॅनर्सच्या माध्यमातून नक्षलवाद्यांनी केले आहे. 

सरन्यायाधीशपदासाठी न्या. शरद बोबडे यांच्या नावाची शिफारस