पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आदित्य ठाकरे भरघोस मतांनी जिंकतील: संजय दत्त

संजय दत्त

बॉलिवूडचा सूपरस्टार संजय दत्तने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना समर्थन दिले आहे. त्याने ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. संजय दत्तने व्हिडिओच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. 'आदित्य माझ्या छोट्या भावासारखा आहे. मला आशा आहे की या निवडणुकीत आदित्य ठाकरे भरघोस मतांनी जिंकून येतील', असे संजय दत्तने सांगितले.

अयोध्या सुनावणीःयूपीत हालचालींना वेग, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

यावेळी, संजय दत्त यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या मदतीची आठवण काढली. 'बाळासाहेब ठाकरेंनी मला खूप पाठिंबा दिला. ते माझ्या वडिलांसारखे होते. त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबियांना खूप मदत केली हे मी कधीच विसरणार नाही. या निवडणुकीत आदित्य ठाकरे भरघोस मतांनी जिंकून येतील, असे मला वाटत असल्याचे संजय दत्त याने सांगितले आहे. 

मोदीजी, परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी रस्त्यानं याः धनंजय मुंडे

दरम्यान, आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ बॉलिवूडचे अनेक कलाकार पुढे आले आहेत. अभिनेता दिनू मोर्या, सुनील शेट्टी यांनी देखील व्हिडीओच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

सावरकरांच्या मुद्द्यावरून मोदींची विरोधकांवर टीका