पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपवाले इतिहासही बदलतील म्हणून त्यांना सत्तेपासून दूर ठेवा - शरद पवार

शरद पवार

भाजपचे नेते उद्या आपला इतिहासही बदलतील, याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. म्हणूनच त्यांना सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पंढरपूरमधील जाहीर सभेत केले. लोकांचा कौल काही वेगळाच होता, हे मुख्यमंत्र्यांना २४ तारखेलाच कळेल, असाही टोला त्यांनी लगावला. 

विश्वास ठेवू नका, १००० रुपयांच्या नोटेचे व्हायरल झालेले फोटो खोटे

शरद पवार म्हणाले, राज्यातील गड-किल्ल्यांवर दारूचे अड्डे आणि डान्सबार सुरू करण्याचा घाट घातला जातो आहे. इतिहासाच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास काढून टाकला जातो आहे. हे सगळे बघितल्यावर उद्या आपला इतिहासही भाजपचे लोक बदलतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. यासाठीच त्यांना सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे. 

भाजपच्या नेत्यांनी आश्वासनांशिवाय दुसरे काहीच दिले नाही, याचा उल्लेख करून त्यांनी सांगितले की, अरबी समुद्रात तीन वर्षांत शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करू, असे आश्वासन भाजपने दिले होते. पण आज पाच वर्षे झाली त्या ठिकाणी काहीही काम झालेले नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे कामही या लोकांनी पुढे नेलेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मेक्सिकोतून ३११ भारतीयांना बेकायदा प्रवेशावरून मायदेशी परत पाठवले

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे भाजपने कायम दुर्लक्ष केल्याचा आरोप करून शरद पवार यांनी राज्य चालवताना राज्यकर्त्यांनी सर्वांच्या हिताची जपणूक केली पाहिजे, असे सांगितले.