पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजप यंत्रणांना हाताशी धरुन विरोधकांना धमकावतेय- अशोक चव्हाण

अशोक चव्हण

भाजप सरकारी यंत्रणांना हाताशी धरून विरोधी पक्ष्यांच्या नेत्यांना धमकावतेय असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना केला आहे. 

शिवसेना-भाजप ताट वाट्या घेऊन फिरतायेत : राज ठाकरे

'सरकारी यंत्रणा विरोधी पक्ष्यातील नेत्यांवर बारीक लक्ष ठेवून आहे. पोलिस यंत्रणेला भाजपसाठी काम करण्याकरता धमकावलं जातंय.  भाजप सरकारनं काही लोकांना हाताशी धरून या निवडणुकीत पैसा ओतला आहे. राज्यातून खंडणी उकळण्याचं प्रमाण वाढलं आहे. पोलिस यंत्रणेत राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. चांगल्या पोलिसांच्या जाणीवपूवर्क बदली होत आहेत. डॉक्टर्स आणि व्यावसायिकांना खंडणीच्या धमक्यांचे फोन येत आहेत', असा आरोप चव्हाण यांनी केला आहे. 

अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताच सौरव गांगुली घेणार हा मोठा निर्णय

'दोन वर्षांपूर्वी पालघर येथील पोटनिवडणुकीत असाच प्रकार घडला होता. काही वरिष्ठ पोलिस अधिकारी भाजप सरकारला मदत करत आहेत. माझ्या कुटुंबानं ४० वर्षे सत्ता पाहिली मात्र अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर भूतकाळात कधीही झाला नव्हता', असं चव्हाण म्हणाले. 

'अनेक नेते हे रडावर आहेत. त्यांना चौकशीसाठी बोलावलं जात आहे. मात्र भ्रष्ट्राचाराचे खोटे आरोप लावून नोटीस पाठवली जात आहे. चौकशीच्या फेऱ्यात अडकवलं जात आहे ही गोष्ट एखाद्या नेत्याची राजकीय प्रतिमा मलिन करण्यासाठी पुरेशी आहे. तुम्ही स्वत:ला निर्दोष सिद्धही कराल मात्र तोपर्यंत खूप मोठं नुकसान झालेलं असतं.  या सरकारमधल्या अनेक नेत्यांनी भष्ट्राचार केला आहे पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. अद्यापही पंजाब  महाराष्ट्र बँकेच्या संचालकांविरोधात का ठोस कारवाई करण्यात आली नाही? असा जाबही चव्हाण यांनी विचारला आहे. 

उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; हर्षवर्धन जाधवांच्या घरावर दगडफेक