पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजप आमदारांची मुंबईत बैठक, या प्रमुख मुद्यांवर होणार चर्चा

आशिष शेलार

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने मुंबईत आपल्या नव निर्वाचित आमदारांची बैठक बोलवली आहे. दादर येथील वसंत स्मृती सभागृहात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपला समर्थन देणारे आमदारही या बैठकीला उपस्थित आहेत. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांसमोर यासंदर्भातील माहिती दिली. 

'लोकसभा निवडणुकीतही हारले आणि आता सुप्रीम कोर्टातही'

शेलार म्हणाले की, या बैठकीत तीन महत्त्वाचे मुद्यावर चर्चा होणार असून यात महाराष्ट्रातील सद्याची राजकीय परिस्थिती, अतिवृष्टिमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल यासह अंतर्गत आणि संघटनात्मक निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबत चर्चा होणार आहे. या सर्व मुद्यांवर व्यापक चर्चा करण्यासाठी एक ते दोन तास ही बैठकीत चर्चा अपेक्षित असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.  

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी भाजप-शिवसेना यांच्यात तेढ निर्माण झाल्यामुळे सत्तास्थापनेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपने सत्ता स्थापन करण्यात असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यपालांनी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले. मात्र या दोन्ही पक्षांना राज्यपालांनी दिलेल्या वेळेत सत्ता स्थापनेचा यशस्वी दावा करता आला नाही.

पवारांना शेतकऱ्यांची चिंता; विदर्भातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी

परिणामी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील दिसत आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या गोटातही सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी भाजप नेते नारायण राणे यांनी याचे संकेत दिले. त्यामुळे भाजपची ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जाते.