पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चार बंडखोर उमेदवार भाजपमधून निलंबित

भाजप

महायुतीच्या घोषणा आणि जागावाटपानंतर बंडखोरी करीत महायुतीच्या उमेदवाराला आव्हान देणाऱ्या नेत्यांवर भाजपने कारवाईचा बडगा उगारला आहे. बंडखोरी करणाऱ्या एकूण चार नेत्यांना भाजपने पक्षातून निलंबित केले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे.

मोदी, फडणवीस सरकार शेतकरीविरोधी : अजित पवार

तुमसरमधून बंडखोरी केलेले चरण वाघमारे, मीरा भाईंदरमधून बंडखोरी केलेल्या गीता जैन, पिंपरीतून बंडखोरी केलेले बाळासाहेब ओव्हाळ आणि अहमदपूरमधून बंडखोरी केलेले दिलीप देशमुख यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. बंडखोरी केलेले भाजपचे पालघरमधील जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी आधीच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.