पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकसभेत युतीसाठी सेनेची मुख्यमंत्रीपदाची अट होती, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

भाजप- शिवसेना

मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना- भाजप या दोन्ही मित्रपक्षांमध्ये वाद सुरू होते. दोन्ही पक्षांत वादाची ठिणगी २०१९ च्या लोकसभा निवडणुकांआधीच पडली होती, पण दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी तेव्हा वादाला खतपाणी न घालण्याचा निर्णय सामंजस्यानं घेतला होता असा गौप्यस्फोट  भाजपच्या नेत्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना केला आहे. 

'फेब्रुवारी महिन्यात लोकसभेसाठी सेना भाजपनं युतीची घोषणा केली, तेव्हापासून दोन्ही पक्षात वाद सुरू झाला. युतीच्या घोषणेबरोबर मुख्यमंत्रीपद किंवा पदाची दोन्ही पक्षात समान विभागणी या मुद्द्यावर चर्चा करण्याची हिच योग्य वेळ असल्याचं  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाटत होतं. लोकसभेत युतीसाठी सेनेची मुख्यमंत्रीपदाची अट होती', अशीही माहिती भाजपच्या नेत्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. 

अखेर काडीमोड!, शिवसेना एनडीएतून बाहेर, भाजपची घोषणा

'लोकसभेच्या मतदानाला काही आठवडे उरले असताना, वाटाघाटींच्या चर्चेला हवे तसे यश येत नसल्यानं देवेंद्र फडणवीस यांनी मध्यरात्री दोन वाजत अमित शहा यांना फोन केला  होता. जर युती तुटली तर? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी शहांना विचारला होता. त्यावेळी मुख्यमंत्री पदाची समान विभागणी शहा यांना मान्य नव्हती. सेनेसोबत जरी युती झाली तरी सेनेला  मुख्यमंत्री पद देण्यात भाजपमधल्या अनेक नेत्यांचा  विरोध होता. कारण मित्रपक्ष असूनही सेनेच्या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका  करणं सुरूच होतं. मात्र सेनेसोबत मोदींना युती तोडायची नव्हती'  असंही या भाजपच्या नेत्यानं सांगितलं.

आम्ही मेगा भरती करणार नाही, जे होईल ते 'मेरिट'वरच : जयंत पाटील

 'अमित शहा हे स्वत: मातोश्रीवर आले होते, म्हणूनच भाजपसोबत युती करायला उद्धव ठाकरे तयार झाले. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चाही झाली होती,  त्यावेळी तिथे देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते', असं भाजपच्या नेत्यानं सांगितलं. 

'लोकसभा निवडणुकांच्या विजयानंतरही मुख्यमंत्री पद विभागून देण्याच्या मुद्दा उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता.  या कारणावरुन शिवसेनेसोबत युती तोडण्याला मोदींचा विरोध होता. लोकसभेच्या निवडणुकीत युती यशस्वी झालीये, आता  त्यांना नंतर बाजूला करु शकत नाही', असं मोदींचं मत असल्याचंही भाजप नेते म्हणाले. 

'मी पुन्हा येईन'; शिवतीर्थावर फडणवीसांविरोधात घोषणाबाजी

'शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी राजिनामा देण्यापूर्वी फडणवीस यांनी मातोश्रीवर दोनदा फोन केले  होते त्यांना उद्धव ठाकरेंशी बोलायचं होतं, मात्र त्यांना  कोणताही प्रतिसाद मिळाला नाही', अशीही महिती नेत्यांनी दिली. 

 मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवण्यास युती अपयशी झालीये त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा सेनेचा मानस आहे.