पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सत्ता स्थापण्यासाठी भाजप-शिवसेना एकत्र येतीलः शरद पवार

शरद पवार  (PTI)

शिवसेना भाजपबरोबरची साथ सोडेल का नाही याची राष्ट्रवादी काँग्रेसला खात्री नाही. पण तरीही त्यांनी 'प्लॅन बी' (शिवसेना-राष्ट्रवादी) तयार ठेवला आहे. पक्षातील अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करण्याची ही योजना असून काँग्रेसचा बाहेरुन पाठिंबा घेतला जाऊ शकतो. दोन्ही पक्ष काही छोटे पक्ष आणि अपक्षांना बरोबर घेऊन १२५ आकडा गाठण्याचा प्रयत्न करतील. काँग्रेसचा सरकारमध्ये थेट सहभाग नसेल. त्यांना समाजातील काही घटकांमधून प्रतिकूल प्रतिक्रिया येण्याची भीती आहे. गुरुवारी राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी बोलावलेल्या पक्षाच्या कोअर समितीसमोर यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. 

आधी ईडीची आता राष्ट्रपती राजवटीची धमकी, संजय राऊत यांचा आरोप

तथापि, पवार यांनी शिवसेनेकडून अशा प्रकारचा कोणताच प्रस्ताव आला नाही व सरकार स्थापण्यासाठी आम्ही त्यांच्या संपर्कातही नसल्याचे स्पष्ट केले. एका वृत्त वाहिनीशी बोलताना पवार यांनी मात्र भाजप-शिवसेना सरकार स्थापन करण्यासाठी एकत्र येतील असा विश्वास व्यक्त केला. 'आमच्याबरोबर यायचे असेल तर त्यांनी भाजपबरोबरील संबंध तोडावेत. कदाचित आमच्याबरोबरील चर्चेचा ते भाजपबरोबर सत्तेत वाटा मिळवण्यासाठी वापर करतील, असे आम्हाला वाटते,' असे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने म्हटले. दरम्यान, शरद पवार हे ४ किंवा ५ नोव्हेंबर रोजी दिल्लाला जाणार असून ते तिथे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

भाजपपेक्षा शिवसेना बरी, सेनेला पाठिंबा देण्यासाठी दलवाईंचे पत्र