पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जाग वाटपावरून युतीत दुमत, भाजप देत असलेल्या जागा शिवसेनेला अमान्य

उद्धव ठाकरे, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी नवी दिल्लीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाच्या कोअर समितीची बैठक घेतली. या बैठकीला पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या बैठकीत युतीचा फॉर्म्युल्यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर या संदर्भात भाजपची भूमिका काय असेल हे निश्चित करण्यात आले असून, ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळविण्याची जबाबादारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपविण्यात आली आहे. दरम्यान, युतीची घोषणा ही २८ सप्टेंबरनंतरच होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये शिवसेनेला १२० जागा देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. पण १२६ पेक्षा एकही जागा कमी करण्यास शिवसेना तयार नाही. त्यातही ८ ते १० जागांवरूनही दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालेले नाही. या जागा शिवसेनेला हव्या आहेत. यामध्ये नवी मुंबई, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईतील जागांचा समावेश आहे.

शरद पवार दुपारी ईडी कार्यालयात जाणार; दक्षिण मुंबईत जमावबंदी लागू

गुरुवारी झालेली बैठक ही तब्बल नऊ तास सुरू होती. या बैठकीत भाजपच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. बैठकीत युतीचा फॉर्म्युला नक्की काय असेल, यावरही चर्चा करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप स्वतःसाठी आणि मित्रपक्षांसाठी मिळून १६२ जागा ठेवणार असून, शिवसेनेला १२६ जागा देण्यात येणार आहेत. मित्रपक्षांसाठी भाजप स्वतःच्या कोट्यातील केवळ आठच जागा सोडण्यास तयार आहे. त्यातही या आठ जागांवर उभे राहणाऱ्या मित्रपक्षाच्या उमेदवारांना कमळ चिन्हावरच निवडणूक लढविण्याचे बंधन घालण्यात येणार आहे. पण शिवसेनेला १२० जागाच दिल्या जाव्यात असे चर्चेत अंतिम फेरीत ठरविण्यात आल्याचे समजते. 

विधानसभेतील एकूण २८८ जागांपैकी निम्म्यापेक्षा जास्त जागांवर विजय मिळवण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. युती असली तरी विधानसभेत भाजपकडे एकट्याच्या जीवावर बहुमत असेल, असेच नियोजन करण्यात येणार आहे.

'माफ करा साहेब! यावेळी तुमचे ऐकणार नाही' 

बैठकीमध्ये पक्षाच्या अध्यक्षांनी महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांबद्दल चर्चा केली. त्यामुळे ही बैठक उशिरापर्यंत सुरू होती. बैठकीमध्ये बहुतांश उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. एकूण २० टक्क्यांपेक्षा जास्त जागांवर आमच्याकडे एकापेक्षा जास्त उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. आता देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात बैठक होऊन त्यानंतर युतीचा अंतिम फॉर्म्युला निश्चित केला जाईल.