पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्धव ठाकरेंच्या 'त्या' विधानावर प्रकाश जावडेकर म्हणाले...

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे

महाराष्ट्रात एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री नक्की होईल, अशी आशा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना भाजपशी युती करून राज्यात निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यातही जागा वाटपात शिवसेनेला भाजपशी तडजोड करावी लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना स्मितहास्य केले. ते म्हणाले, शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. आपल्या मनातील इच्छा व्यक्त करण्यात काहीही गैर आहे, असे मला वाटत नाही.

पुन्हा सत्ता मिळवण्यासाठीच जागावाटपात भाजपशी तडजोड - उद्धव ठाकरे

विधानसभा निवडणुकीत राज्यातील २८८ जागांपैकी युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला १२४ जागा आल्या आहेत. त्यासोबतच विधान परिषदेत भाजपच्या कोट्यातील दोन जागा शिवसेनेला देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. त्याचवेळी भाजप आणि इतर मित्रपक्ष मिळून १६४ जागांवर निवडणूक लढवित आहेत. यापैकी १४ जागा या मित्रपक्षांना देण्यात आल्या आहेत. पण ते सर्वजण भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढविणार आहेत. 

भाजपने मला धोका दिला, तरीही आम्ही महायुतीसोबतः जानकर

गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असे जाहीर सभांमधून सांगत आहेत. पक्षाच्या मेळाव्यामध्येही हा मुद्दा उपस्थित केला जातो आहे. त्यातच आदित्य ठाकरे यावेळी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पण आदित्य ठाकरे निवडणुकीला उभे असले तरी ते मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीपदासाठी नाही. विधीमंडळ कामकाजाचा त्यांना अनुभव मिळावा, यासाठी ते निवडणूक लढवित आहेत, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.