पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपचा 'दुष्काळमुक्त महाराष्ट्र'चा संकल्प

भाजपचे संकल्पपत्र जाहीर

भाजपने निवडणुकीसाठी आपलं संकल्पपत्र प्रकाशित केले. वांद्र्यातील रंगशारदा सभागृहामध्ये भाजपचा संकल्पपत्र प्रकाशनाचा सोहळा झाला. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचे संकल्पपत्र प्रकाशित करण्यात आले. दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा आमचा पहिला संकल्प असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच दुष्काळमुक्ती, रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा, नदीजोड प्रकल्पांवर भर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

महाराष्ट्राच्या प्रांजल पाटील पहिल्या दृष्टिहीन महिला आयएएस

भाजपने गेल्या ५ वर्षात केलेली कामं, भविष्यातील आव्हानांचा विचार करून आणि भविष्यातील महाराष्ट्राची दिशा लक्षात घेऊन भाजपनं संकल्पपत्र तयार केले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दुष्काळमुक्त महाराष्ट्र हे भाजपचे लक्ष्य असणार आहे. तसंच या संकल्पपत्रातून दुष्काळमुक्त महाराष्ट्र, रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा यावर भर देण्यात आला आहे. तसंच समजातील सर्व स्थरापर्यंत विकास पोहचला पाहिजे हेच आमचे मुख्य उद्दिष्टये असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

नालासोपारा पोलिस ठाण्यात गळा चिरून आरोपीची हत्या

संकल्पपत्रामध्ये नदीजोड प्रकल्पावर भर देण्यात आला आहे. कोकणातले पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्यात येणार आहे. समुद्रामध्ये वाहून जाणारे पाणी कॅनॉलच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागांमध्ये नेण्यात येणार आहे. तसंच समाजातील सर्व घटकांच्या विकासाचा विचार आम्ही संकल्पपत्रामध्ये केला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळवून देणार आहे. तसंच मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पाला चालना देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ३ हजार ८३० कोटींची मालमत्ता जप्त

दरम्यान येत्या ५ वर्षात १ कोटी रोजगार निर्मिती करणार आहे. २०२२ पर्यंत सर्वांना शुद्ध पाणी आणि घरं देण्यात येणार असल्याचे संकल्पपत्रात म्हटले आहे. राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्याकडे भर देण्यात येणार आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आणि इंदू मिल स्मारकाचे काम देखील पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.