पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आमच्यात मुख्यमंत्री कोण हे ठरलं होतं, अमित शहांनी सोडले मौन

अमित शहा

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेच्या तिढ्यावर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. प्रचारसभेत माझ्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, असे सांगितले होते. यावेळी शिवसेनेने आक्षेप का घेतला नाही? असा प्रश्न अमित शहा यांनी उपस्थित केला आहे.  

सेना आघाडीसोबत जाऊ नये यासाठी भाजप प्रयत्नशील : पृथ्वीराज

महायुतीला स्पष्ट जनादेश मिळाल्यानंतर मान्य न होणाऱ्या अटी मित्र पक्षाकडून ठेवण्यात आल्याचे अमित शहांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. महायुतीचा विजय झाला तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील हे ठरलं होते. बंद दारा आड याशिवाय झालेल्या चर्चेवर मला काहीही बोलायचे नाही. प्रचारसभेमध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा दावा करण्यात आला होता. यावेळी सेनेने कोणताही आक्षेप घेतला नाही. अचानकपणे मित्र पक्षाने अनावश्यक मागण्या केल्या. सेनेच्या अट्टाहासामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली, असेही ते म्हणाले. १४५ संख्याबळ असणाऱ्यांनी सत्तास्थापनेचा दावा करावा, असेही ते यावेळी म्हणाले. 

'उद्धव ठाकरेंची भेट हीच एक सकारात्मक गोष्ट'

राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा उपस्थित करुन विरोधक राजकारण करत आहेत. सध्याच्या घडीला कोणत्याही पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नाही. राज्यपालांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. जर हा निर्णय घेतला नसता तर भाजप काळजीवाहू सरकार चालवत असल्याचा आरोप झाला असता, असेही अमित शहांनी म्हटले आहे.