पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कर्नाटक कनेक्शन! रेनेसान्स हॉटेलमध्येच महाराष्ट्राचं सरकार ठरेल'

नवाब मलिक (photo by Satyabrata Tripathy/ht)

राज्यातील राजकारणातील हालचाली या अंदाज वर्तवण्याच्या पलिकडे सुरु आहेत.  राजकीय घडामोडीमध्ये कधी काय ट्विस्ट निर्माण होईल हे सांगता येणं अशक्य आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या साथीनं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यापाठोपाठ अजित पवारांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपला आता संख्याबळ सिद्ध करण्याची कसोटी पास करावी लागणार आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असे भाजपकडून सांगण्यात येत असताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपचा डाव उलटवून लावणार असल्याचे म्हटले आहे. 

..दिग्विजय सिंह यांनी सु्प्रिया सुळेंना दिल्या शुभेच्छा

ज्या भाजपने रेनेसान्स हॉटेलच्या साक्षीनं कर्नाटकमधील सरकार पाडले. त्याच हॉटेलमधून महाराष्ट्रात नवे सरकार बनले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. संघर्षाशिवाय विकास होत नाही, असे सांगत त्यांनी भाजपला फ्लोअर टेस्टमध्ये पराभूत करण्यात आम्ही सज्ज असल्याचे सांगितले. अजित पवार यांच्यासोबत असणारे अनेक आमदार पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात येत आहेत. त्यामुळे राज्यातील  राजकीय संघर्षात आणखी कोणते वळण येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

फडणवीस यांच्या शपथविधीमुळे प्राध्यापकाला 'शॉक', पण रजा नामंजूर

राज्यातील सत्तासंघर्षाचा खरा फैसला हा आता विधानसभेतील बहुमत चाचणीवेळीच स्पष्ट होणार आहे. सत्तास्थापनेसाठी घोडेबाजार होऊ नये, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांनी आपापल्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे. राष्ट्रवादीचे आमदार मुंबईतील रेनेसान्स हॉटेलमध्ये आहेत. या आमदारांच्या भेटीला आल्यानंतर नवाब मलिक यांनी भाजपला टोला लगावला आहे.