पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'ते काय युध्द लढणार आमच्याशी, जे स्वत: मनाने हारले आहेत'

पंकजा मुंडे

भाजपच्या उमेदवार आणि विद्यमान मंत्री पंकजा मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला. त्यामुळे परळी मतदार संघातील मुंडे बहिण-भाऊ यांच्यातील वाद पेटल्याचे पाहायला मिळत आहे. या वादानंतर आज मतदानाच्या दिवशी पंकजा मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर हिंदीमध्ये एक कविता शेअर करत धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. गडचिरोलीत निवडणूक कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाचा मृत्यू

'आमचा विजय निश्चित आहे. ते काय युध्द लढणार आमच्याशी, जे स्वत: मनाने हारले आहेत', असे म्हणत पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे यांच्या या पोस्टला खूप लाईक्स मिळाले असून ही पोस्ट व्हायरल सुध्दा होत आहे. 

बोगस मतदारांवरुन बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्यात जुंपली

धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर नाराज झालेल्या पंकजा मुंडे यांनी तब्बल १२ तासानंतर जनतेच्या समोर आल्या होत्या. मात्र त्यांनी त्याबाबत काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. 'मला आता काहीच वाटत नाही. धनंजय माझ्यासंदर्भात अशा प्रकारची भाषा वापरेल, असे कधीच वाटले नव्हते. कुटुंबातील वादाला धनंजय मुंडे हेच जबाबदार आहेत. त्यांनी माझ्याबद्दल केलेल्या विधानामुळे मला त्यांचा तिरस्कार वाटतोय', अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत धनंजय मुंडेंवर टीका केली आहे.  

पिंपरीत ९ बोगस मतदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात