पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'राजीनामा दिला तरी अजित पवारांवरील कारवाई थांबणार नाही'

गिरीश महाजन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांना देखील धक्का बसला आहे. याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. 'अजित पवार यांनी जरी राजीनामा दिला असला तरी त्यांच्याविरोधातील कारवाई काही थांबणार नाही' असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

राष्ट्रवादीत हालचालींना वेग; पवारांच्या घरी नेत्यांची झाली बैठक

दरम्यान, 'अजित पवार यांच्या राजीनाम्याची बातमी ऐकून मला सुध्दा धक्का बसला. राष्ट्रवादीत सुरु असलेला तणाव आणि त्यांच्या कुटुंबात सुरु असलेला अंतर्गत कलह या कारणांमुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असू शकतो', असे महाजनांनी सांगितले. 'अजित पवारांनी राजीनामा दिला हे त्यांच्या कुटुंबाला माहित नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबात असलेला कौटुंबिक कलह दिसून येत आहे.' असे देखील महाजन यांनी सांगितले.

'राजीनामा देण्यापूर्वी अजित पवारांची मुलाशी चर्चा पण माझ्याशी नाही'

दरम्यान, अजित पवार राजीनामा देणार याची शरद पवार यांना माहिती नव्हती यावर कोण विश्वास ठेवणार आहे का? असा प्रश्न त्यांनी केला आहे. तसंच जर पवारांना खरंच याबाबत काही माहिती नसेल तर त्यांच्या घरामध्ये किती टोकाचा संघर्ष सुरु आहे हे तुम्ही समजू शकता', असे देखील गिरीश महाजन यांनी सांगितले. 

अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा