पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले

महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपने एकमताने पक्षाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केली आहे. आज (रविवार) विधानसभेच्या सत्रात अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्या नियुक्तीची घोषणा केली. फडणवीस यांची निवड होणार हे निश्चित होती. त्याची औपचारिकता आज पार पाडली. 

शेतकऱ्याचा पुत्र अध्यक्ष झाला याचा आनंद: मुख्यमंत्री

विरोधी पक्षनेत्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या आसनाकडे येत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्ताधारी बाकावरील अनेक सदस्यांनी फडणवीस यांच्या जागेवर येत त्यांचे अभिनंदन केले. 

फडणवीस यांनी गत विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. आता भाजप विरोधी पक्षात बसल्यामुळे त्यांच्याकडे पक्षाने विरोधी पक्ष नेत्याची जबादारी दिली आहे. 

पाच वर्षांत ११४ कंपन्या बंद, १६ हजार कर्मचाऱ्यांना फटका

फडणवीस यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह इतर सदस्यांनी भाषण केले. अनेकांनी आपल्या भाषणात फडणवीस यांना चिमटे काढले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:BJP leader Devendra Fadnavis has been elected as Leader of Opposition of Maharashtra Assembly