विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहे. आज दसऱ्याच्या निमित्ताने अनेक ठिकाणी राजकीय पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला. कोल्हापूरातील राधानगरी मतदार संघाचे शिवसेना उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर यांची प्रचार तुरंबे येथे सभा झाली. या प्रचार सभेत बोलताना भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांना राजकारण आणि समाजकारणातून कायमची विश्रांती देणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
काँग्रेस निवडणूक जिंकण्याची शक्यता कमीच, सलमान खुर्शीद यांचे वक्तव्य
दरम्यान, 'मला कोथरुडमध्ये अडकवून ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला साधा एकही उमेदवार मिळाला नाही. त्यावरुन दोन्ही पक्षाची ताकद काय हे कळून येते, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली. तसंच या मतदार संघातून मी निवडून येणार हे सांगण्यासाठी जोतिष्याची गरज नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील युतीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
नोकऱ्या जाताहेत, उद्योग बंद पडताहेत हे स्वीकारा- उद्धव ठाकरे