पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपचे घाटकोपर पूर्वतील उमेदवार पराग शहा ५०० कोटींचे धनी

भाजपचे घाटकोपर पूर्वतील उमेदवार पराग शहा

मुंबईच्या घाटकोपर पूर्व मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पराग शहा हे निवडणूक लढवणाऱ्या सर्वात श्रीमंत उमेदवारांपैकी एक ठरले आहेत. भाजपमधील विद्यामान आमदार प्रकाश मेहता यांना  डावलून पराग शहा यांना उमेदवारी देण्यात आली. पराग शहा यांनी शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्जात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शहा यांनी आपली एकूण संपत्ती ५००.६२ कोटी  असल्याचं नमूद केलं आहे. 

प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार शहा यांच्याकडे ४४२ कोटींची जंगम  मालमत्ता आहे तर ७८ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. शहा यांच्या मालकीचा ठाण्यात ५ हजार ७१० चौरस फुटांचा आलिशान बंगला आहे. ज्याची किंमत १५ कोटी आहे. चेंबूरमध्ये शहा यांच्या तीन सदनिका असून त्यांचे बाजारमूल्य २५ कोटींच्या घरात आहे. पराग शहा आणि त्यांच्या पत्नीच्या मालकीच्या महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये जमिनी आहेत. 

शरद पवारांचे नातू रोहित पवारांची संपत्ती ६५ कोटी

शहा यांच्या पत्नीकडे आलिशान कार असून या कारची किंमत २.४७ कोटी आहे. दोघांची मालकी हक्क असलेल्या दागिन्यांचे बाजार मूल्य हे ३.४५ कोटी असल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे. 

भाजपनं शुक्रवारी आपली चौथी यादी जाहीर केली या यादीतून घाटकोपर पूर्व मतदारसंघातून शहा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. विद्यामान आमदार प्रकाश मेहता यांना  डावलून शहा यांना उमेदवारी दिल्यानं शुक्रवारी दुपारी घाटकोर पूर्वमध्ये मेहता- शहा समर्थकांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा रंगला होता. नाराज झालेल्या मेहता समर्थकांनी शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या गाडीची तोडफोडही केली होती. 

आदित्य ठाकरे 'कोट्यधीश', एकूण संपत्ती १६.५ कोटी