पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपची चौथी यादी जाहीर; विनोद तावडे, राज पुरोहित यांना धक्का

राज पुरोहित आणि विनोद तावडे

भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी चौथी यादी शुक्रवारी सकाळी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर सध्याच्या सरकारमधील मंत्री विनोद तावडे यांच्या बोरिवली मतदारसंघातून सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे विनोद तावडे यांना पक्षाने तिकीट नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर कुलाबा मतदारसंघातून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणचे आमदार राज पुरोहित यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे.

काँग्रेसने नाना पटोलेंना साकोलीमधून दिली उमेदवारी

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता या भाजपतील नेत्यांना तिकीट मिळणार की नाही, याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अखेर या तिन्ही नेत्यांना तिकीट नाकारण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे विनोद तावडे यांना पक्षाने मोठा झटका दिला आहे.

काँग्रेसने चौथ्या यादीतून दिला मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील उमेदवार

भाजपने एकूण सात जणांची चौथी यादी शुक्रवारी सकाळी जाहीर केली. यामध्ये मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कुलाबा मतदारसंघातून राहुल नार्वेकर यांना, बोरिवली मतदारसंघातून सुनील राणे यांना, घाटकोपर पूर्व मतदारसंघातून पराग शहा यांना, विदर्भातील काटोल मतदारसंघातून चरणसिंह ठाकूर यांना, तुमसर मतदारसंघातून प्रदीप पडोळे आणि नाशिक पूर्व मतदारसंघातून राहुल ढिकले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.