पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

युतीमध्ये पुण्यात आठही ठिकाणी भाजपचे उमेदवार, शिवसेना 'गायब'

भाजप

शिवसेनेशी युती असली तरीही विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये पुण्यातील आठही मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. पुण्यात एकही उमेदवार नसल्यामुळे शिवसेना शहरातून गायब झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. युतीची घोषणा एका निवेदनाद्वारे सोमवारी करण्यात आलेली असली, तरी जागा वाटप अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे युतीचा फॉर्म्युला नक्की काय असेल, हे सुद्धा स्पष्ट झालेले नाही.

भाजपची १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

पुण्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. या सर्व ठिकाणी गेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. अर्थात गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये कसबा पेठ मतदारसंघातून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोथरूड मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवाजीनगर मतदारसंघातून सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांना तर खडकवासला मतदारसंघातून भीमराव तापकीर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 

हडपसर मतदारसंघातून योगेश टिळेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून सुनील कांबळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. वडगाव शेरी मतदारसंघातून जगदीश मुळीक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

साताऱ्यात श्रीनिवास पाटील लोकसभेसाठी आघाडीचे उमेदवार

पुण्यात शिवाजीनगरमध्ये विजय काळे यांचे तर पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात दिलीप कांबळे यांचे तिकीट कापण्यात आले आहे. कसबा पेठ मतदारसंघातील माजी आमदार गिरीष बापट आता खासदार झाल्याने त्या ठिकाणी मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.