पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपतील वाद चव्हाट्यावर, पराग शहांच्या गाडीवर मेहतांच्या समर्थकांचा हल्ला

पराग शहांच्या गाडीची तोडफोड

 उमेदवारी अर्ज  भरण्याचा आज शेवटचा  दिवस आहे आणि  भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. घाटकोपरमध्ये प्रकाश मेहतांच्या समर्थकांचा पराग शहा यांच्याविरोधात हाय व्होल्टेज ड्रामा रंगला. प्रकाश मेहतांऐवजी पराग शहांनां तिकीट दिल्यामुळे नाराज मेहता समर्थकांनी पराग शहांच्या गाडीवर हल्ला केला. यात गाडीचं नुकसान झालं आहे. 

PMC बॅंकेच्या तपासात EDची एंट्री, मुंबईत सहा ठिकाणी छापे

भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी चौथी यादी शुक्रवारी सकाळी जाहीर केली आहे. या यादीतून प्रकाश मेहतांसारख्या भाजपच्या अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याला वगळण्यात आलं. प्रकाश मेहतांऐवजी घाटकोपर पूर्व मतदारसंघातून पराग शहा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या प्रकाश मेहतांच्या समर्थकांनी पराग शहा यांच्या गाडीचा रस्ता उडवला. शहा यांच्याविरोधात घोषणा देत नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या  गाडीची तोडफोड केली. 

 मेट्रो-३ कारशेडचा मार्ग मोकळा; सर्व याचिका कोर्टाने फेटाळल्या 

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पराग शहा हे प्रकाश मेहता यांच्या भेटीसाठी मेहता यांच्या घरी येत होते. मात्र, मेहता यांच्या संतप्त समर्थकांनी शहांची गाडी रस्त्यातच अडवली. मेहतांच्या समर्थकांनी घरासमोरच शहाविरोधात घोषणाबाजी केली. या प्रकारातून ऐन निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये असलेले  कलह चव्हाट्यावर आले आहेत. घाटकोपरमध्ये असलेली तणावपूर्ण परिस्थिती पाहता येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.