पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कणकवलीत फक्त राणेचं; शिवसेनेचा पराभव

नितेश राणे

विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नितेश राणे यांना कणवलीचा बालेकिल्ला राखण्यात यश आले आहे. नितेश राणे यांनी शिवसेनेच्या सतिश सावंत यांचा पराभव करत विजय मिळवला. कणकवली मतदार संघामध्ये नितेश राणे यांना भाजपने उमेदवारी दिली होती. मात्र युती असताना देखील शिवसेनेने नितेश राणे यांच्याविरोधात सतिश सावंत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र सतिश सावंतांवर मात करत नितेश राणे यांनी विजय मिळवला आहे. सध्या कणकवलीमध्ये राणे समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. 

आकडे इतकेही वाईट नाहीत - संजय राऊत

यंदाची निवडणूक राणे कुटुंबियांसाठी महत्वाची होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी नितेश राणे यांनी आधी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर नारायण राणे आणि निलेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करत असल्याची घोषणा केली होती. नितेश राणे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी कणकवली येथे आले होते. 

धक्कादायकपणे पिछाडीवर असलेले राज्यातील महत्त्वाचे उमेदवार

दरम्यान, नारायण राणेंसोबत गेली २५ वर्षं राहिल्यानंतर सतीश सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना शिवसेनेने नितेश राणेंच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे केले. नितेश राणे आणि सतिश राणे या दोघांमध्ये चुरशीची लढत होती. नितेश राणे यांना पाडण्यासाठी शिवसेनेने पूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र सतिश सावंत यांच्यावर मात करण्यात नितेश राणेंना यश आले. 

सचिन सावंत यांच्या 'त्या' ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!