पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मूळ मुद्द्यांपासून लक्ष हटविण्यासाठीच भाजपकडून कलम ३७०चा वापर - शरद पवार

शरद पवार

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून सातत्याने कलम ३७० रद्द केल्याचा मुद्दा प्रचारात वापरला जातो आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. त्याचवेळी कलम ३७० रद्द करणे हा काही महाराष्ट्रातील लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न नाही. त्यापेक्षा इतर अनेक प्रश्न आहेत. त्यावर भाजप सरकारने काहीच केलेले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 'हिंदुस्थान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी मुद्देसूदपणे राज्यातील प्रश्न उपस्थित केले.

रामजन्मभूमी प्रकरणी सुनावणीचा आज अंतिम दिवस, काय होणार कोर्टात?

शरद पवार म्हणाले, निवडणुकीत राज्यातील महत्त्वाचे प्रश्न बघितले पाहिजेत. राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. शेती संकटात सापडल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. काही शेती उत्पादने घेतल्यावर शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागल्यावर सरकार त्यामध्ये लगेच हस्तक्षेप करते. आता कांद्याचेच उदाहरण घ्या. काद्यांमध्ये शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागल्यावर सरकारने लगेचच हस्तक्षेप करून कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. अशा धोरणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते आहे. दुसरीकडे बियाणे आणि खतांच्या किंमतीवर कोणाचेही नियंत्रण नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सर्वांनी महाराष्ट्रात औद्योगिक प्रगती झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळापासूनच महाराष्ट्रात नागपूर, औरंगाबादसह अनेक ठिकाणी कारखाने उभे राहिले. या कारखान्यांमुळे हजारो लोकांना रोजगार मिळाला. पण भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ५० टक्के कारखाने आज बंद पडले आहेत. अनेक कारखाने बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत, याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले.

२४ तासात पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेधारकाचा मृत्यू

बेरोजगारीच्या प्रश्नावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, राज्यात अनेक तरूण आज बेरोजगार आहेत. पुण्यामध्ये ३० ते ४० अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. पण या महाविद्यालयातून शिकून बाहेर पडणाऱ्या अनेक तरुणांकडे नोकरी नाही, अशी स्थिती आहे. 

राज्यातील निवडणूक एकतर्फी नाही
महाराष्ट्रातील निवडणूक एकतर्फी असल्याचे चित्र पसरविले जात असले, तरी परिस्थिती तशी नाही. जर निवडणूक खरंच एकतर्फी असती, तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यात नऊ जाहीर सभा का घ्याव्या लागल्या असत्या. भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यात २० प्रचारसभा कशासाठी घेतल्या असत्या. भाजपचे वरिष्ठ नेते राज्यात इतका वेळ का घालवत आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीत काय दिसले आणि विधानसभा निवडणुकीत काय दिसेल, यामध्ये जमीनअस्मानाचे अंतर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.