पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुन्हा भाजप-सेनेचे सरकारच येईल, आठवलेंना अजूनही आस

रामदास आठवले

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरुन युतीमध्ये बिनसले आहे.  शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणाही भाजपने केली आहे. मात्र केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजप शिवसेना यांच्यातील युतीतील मतभेद दूर होतील, असा विश्वास व्यक्त केला. भाजप-शिवसेना मिळून राज्यात सत्ता स्थापन करतील, असेही आठवले यांनी म्हटले आहे. 

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार आठवले म्हणाले की, भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीतील तेढ दूर करण्याच्या पार्श्वभूमीवर मी अमित भाई (केंद्रीय गृहमंत्री अमित शहा) यांची भेट घेतली. काळजी करु नका, सर्व ठिक आहे. भाजप-शिवसेना मिळूनच राज्यात सरकार स्थापन करेल, असे अमित शहा म्हटले आहे, असे आठवलेंनी सांगितले.  

अखेर काडीमोड!, शिवसेना एनडीएतून बाहेर, भाजपची घोषणा

राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेसह महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र, मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले. राज्यात सत्तास्थापनेचा तिढा निर्माण होऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र आठवलेंनी भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.