पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गोपीचंद पडळकरांनी वंचित बहुजन आघाडीला दिली सोडचिठ्ठी

गोपीचंद पडळकर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला सांगलीमध्ये मोठा धक्का बसला आहे. धनगर समाजाचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकला आहे. सांगलीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर यांनी ही माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून पडळकर भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर आज त्यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे.

पुराच्या पाण्यामुळे पुण्यात गाड्यांचे कोट्यवधींचे नुकसान

दरम्यान, 'मी वंचित बहुजन आघाडीच्या पदाचा राजीनामा दिला असून पक्षाचे काम थांबवले आहे. मुख्यमंत्री धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेत असल्याने समाजाचा भाजपसोबत जाण्याबाबत दबाव येत आहे, असे पडळकर यांनी सांगितले. तसंच, येत्या दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी बोलून पुढची भूमिका काय आहे हे स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पडळकरांनी वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकल्यामुळे ते पुन्हा स्वगृही म्हणजे भाजपमध्ये जाणार असल्याचे म्हटले जात आहे. 

पुण्यात पावसाने घेतला ११ जणांचा बळी; चौघे बेपत्ता