पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमरावतीत स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारावर हल्ला; गाडी पेटवली

उमेदवाराची गाडी जाळली

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार देवेंद्र भुयार यांच्या हल्ला करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता शेदूरजना घाट येथे अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांची गाडी पेटवून दिली. देवेंद्र भुयार हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वरूड मोर्शी मतदारसंघाचे उमेदवार आहेत.  

करमाळा मतदारसंघातील मतदान केंद्रावर दोन गटांत हाणामारी

दरम्यान, जखमी झालेल्या देवेंद्र यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. हल्लेखोरांनी गोळीबार केला असल्याचा आरोप देवेंद्र यांनी केला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात शेदूरजना घाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहे. या घटनेमध्ये देवेंद्र यांची गाडी जळून खाक झाली असून घटनास्थळी तणावाचे वातावरण आहे. 

वीज पुरवठा खंडीत झाल्याने पुण्यात मेणबत्तीच्या प्रकाशात