पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसच्या तिकीट वाटपामध्ये राहुल गांधी लक्ष घालणार नाहीत

राहुल गांधी

महाराष्ट्र आणि हरियाणात पुढील महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी लक्ष घालणार नाहीत. या दोन्ही राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाला तिकीट दिले जावे, यासाठी काँग्रेसच्या बैठका नवी दिल्लीमध्ये झाल्या. पण या बैठकांना राहुल गांधी उपस्थित नव्हते. त्याचबरोबर तिकीट वाटपामध्ये त्यांनी कोणतेही मत मांडलेले नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सलग दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आता सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद आहे.

'राजीनामा दिला तरी अजित पवारांवरील कारवाई थांबणार नाही'

काँग्रेसच्या तिकीट वाटप समितीतील एका सदस्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, तिकीट वाटपामध्ये राहुल गांधी यांना लक्ष घालायचे नाही. पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांनी राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करून याबद्दल निर्णय घ्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या दोन बैठका आतापर्यंत झाल्या आहेत. पण त्याला राहुल गांधी उपस्थित राहिले नाहीत. 

'राजीनामा देण्यापूर्वी अजित पवारांची मुलाशी चर्चा पण माझ्याशी नाही'

राहुल गांधी तिकीट वाटपामध्ये कोणतीही भूमिका निभावणार नसले, तरी निवडणुकीच्या प्रचारासाठी ते या दोन्ही राज्यांत जाणार आहेत. जरी त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला असला, तरी त्याचा अर्थ ते काँग्रेसच्या काराभारातून पूर्णपणे दूर जाणार असे अजिबात नाही. काँग्रेसचा प्रचार अधिक सक्षम व्हावा, यासाठी राहुल गांधी स्वतः प्रयत्न करीत आहेत, असे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य के एच मुनिअप्पा यांनी सांगितले.