पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'PMC बँक घोटाळ्यात कुणाचे नातेवाईक? मोदींनी उत्तर द्यावे'

राहुल गांधी

देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्याची भाषा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंजाब अँण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेतील घोटाळ्यावर भाष्य करावे, असे आव्हान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी दिले आहे. मुंबईतील चांदिवली येथील प्रचारसभेत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. पीएमसी बँकेचे संचालक कोण होते? ते कोणाचे पाहुणे होते? या घोटाळ्यामध्ये किती लोकांचे नुकसान झाले? किती लोकांना पैसे दिले? असे अनेक प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर तोफ डागली. जनतेचे दिशाभूल करुन सरकार गरिबांचा पैसा श्रीमंताकडे वळवत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.  

'नटरंग'सारखे हातवारे आम्हाला करता येत नाही, फडणवीसांचा पवारांना 

राहुल गांधी म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून राज्यात फडणवीसजी आणि दिल्लीत मोदीजी आहेत. देशासह राज्यातील अनेक कारखाने बंद पडले आहेत. परिणामी बेरोजगारी वाढली आहे. मागील ४० वर्षांत पहिल्यांदाच बरोजगारीचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दुसरीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत. छोट्या उद्योजकांची अवस्थाही बिकट आहे. मात्र भाजप या मुद्यावर काहीच बोलायला तयार नाही.  

पिंपरी-चिंचवडमध्ये पंकजा मुंडेंच्या सभेत गोंधळ

ते पुढे म्हणाले, जात, धर्म, प्रांतवादाच्या नावाखाली भाजपने देशात इंग्रजांप्रमाणे फोडाफोडीचे राजकारण सुरु केले आहे. ज्याप्रमाणे इंग्रज भारताला लुटायचे तसेच भाजप गोरगरिबांना लुटून उद्योगपतींच्या तिजोऱ्या भरण्याचे काम करत आहे, असा घणाघात राहुल गांधींनी यावेळी केला. अन्याय रोखण्यासाठी तुम्हाला एकत्र यावे लागेल. कोणी श्रीमंत येऊन तुम्हाला मदत करणार नाही. देशातील बेरोजगार तरुण, छोटे उद्योजक, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन भाजपची सत्ता उलटण्याची गरज आहे. यासाठी काँग्रेस तुमच्या सोबत आहे, असेही राहुल गांधींनी म्हटले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:assembly elections 2019 rahul gandhi target cm devendra fadnavis and narendra modi on pmc bank scam