पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खड्डयात जाण्याची सवय लावून घेऊ नका!

राज ठाकरे

रस्त्यावरील खड्डे, पीएमसी बँक घोटाळा आणि नोकरी कपातीचा मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भिवंडीच्या सभेत राज्य सरकारवर तोफ डागली. महाराष्ट्रात सगळेच सत्तेसाठी धावत आहेत. सक्षम विरोधी पक्ष नसेल तर सत्तेवर येणारे लहरीप्रमाणे वागून तुमच्या भावना चिरडून टाकतात. राजानं मारलं अन् पावसान झोडलं तर तक्रार कोणाकडे करायची? अशी आपल्याकडे जूनी म्हण आहे. आजची परिस्थिती अशी आहे की सरकारने झोडलं अन् पावसाने झोडलं तर तक्रार कोणाकडे करायची. पावसाची तक्रार करता येत नाही पण सरकारची तक्रार करता येते. यासाठी विधानसभेत सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे.  

सलग १४ वेळा निवडून आलेला 'माय का लाल दाखवा', पवारांचे आव्हान

खड्डे पडलेल्या रस्ताचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारवर तोफ डागली. त्यांनी खड्डे दिले तुम्ही खड्ड्यातून जाता. तुम्हाला या गोष्टीचा राग कसा येत नाही. थंड बसणाऱ्या लोकांचे नेतृत्व करायला आवडत नाही, असे सांगत त्यांनी जनतेने सरकारविरोधात पेटून उठण्याची गरज असल्याचे सांगितले. खड्डयात जाण्याची सवय लावून घेऊ नका, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

जम्मू-काश्मीरः श्रीनगरमधील लाल चौकाजवळ ग्रेनेड हल्ला

पंजाब महाराष्ट्र बँकेच्या मुद्द्यावर राज ठाकरे म्हणाले की,  सध्याच्या सरकारच्या काळात काळाबाजार सुरु असून बँकेशी संबंधितांनी आपल्या माणसांचे पैसे काढून घेतले असा आरोपही त्यांनी केला आहे. पैसा सुरक्षित राहिल याची हमी देऊ शकत नसाल तर बँकां उघडण्यासाठी परवानगी का दिली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.