पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोशल मीडियावर रंगली रोहित पवारांच्या या कृतीची चर्चा

रोहित पवार यांनी घेतले राम शिंदे यांचे आशीर्वाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून विद्यमान आमदार आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे यांना पराभूत केले. विजयानंतर त्यांनी रोहित पवारांनी चक्क प्रतिस्पर्धी असलेल्या राम शिंदे यांचे आशीर्वाद घेतले. निवडणूक पार पडली असून मतदार संघातील विकासासाठी एकत्र काम करायचे आहे, अशी विनंती देखील रोहित पवार यांनी यावेळी आपल्या कार्यकर्त्यांसह राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना केली.

'जे ५० वर्षांत झालं नाही ते भाजप-सेना युतीनं करुन दाखवलं'

यावेळी रोहित यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री देखील उपस्थित होत्या. राम शिंदे यांच्या मातोश्रींनी रोहित पवार यांचे औक्षण केले. राम शिंदे यांनी  रोहित यांना फेटा बांधून  राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.निवडणुकीच्या धामधुमीत प्रचारादरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीकेच्या फैरी झाडल्याचे पाहायला मिळाले होते.

मनसेला एका जागेवर यश, कल्याण ग्रामीणमधून प्रमोद

निकालानंतर आपसातले वैर संपवून विकासाची कामे  एकत्रितपणे करण्यासाठी रोहित पवारांनी पुढाकार घेतला आहे. रोहित पवार यांच्या या कृतीनंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना नातू माझ्या राजकाराणाचा वारसा पुढे नेईल, असे भाष्य केले होते. विधानसभेतील विजयानंतर त्यांनी याचा दाखलाच दिलाय म्हटल्यास वावगे ठरणार नाही.