पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धनं'जय' भाऊच ठरले भारी, पंकजा मुंडेंची हॅट्ट्रिक हुकली! 

परळी मतदार संघात धनंजय मुंडेंनी भाजपच्या उमेदवार आणि ग्रामविकास मंत्री पकंजा मुंडेना पराभूत केले.

प्रचाराच्या तोफ थंडावल्यानंतर आरोप प्रत्यारोपामुळे लक्ष वेधून घेतलेल्या परळी मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांना अखेर यश मिळाले आहे. सुरुवातीला हजार मंताची आघाडी घेत धनंजय मुंडे यांनी चांगली सुरुवात केली. ही आघाडी शेवपर्यंत कायम ठेवत त्यांनी भाजपच्या उमेदवार आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना ३० हजार ७६८ मतांनी पंकजा मुंडे यांना पराभूत केले. पंकजा मुंडे यांनी आपला पराभव  मान्य केला असून हा निकाल अनाकलनिय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दुसरीकडे घरातील माणसाला पराभूत केल्याचे दु:ख वाटते अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे. 

assembly election results 2019 : विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या पंकजा मुंडे यांनी ९६ हजार ९०४  एवढी मते घेत विजय मिळाला होता. यावेळी परळी विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे होते. त्यांना ७१ हजार ९ मते मिळाली होती. २५ हजार ८९५ मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.    

पक्ष बदलला अन् वेळीही! कमळाच्या चिन्हांवर नमिता मुंदडा विजयी

दिवंगत गोपीनाथराव मुंडेंनी पाच वेळा प्रतिनिधित्व केलेल्या या मतदार संघातून त्यांच्या कन्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे तिसऱ्यांदा नशिब आजमावित होत्या. मैदानात त्यांच्यासह १६ उमेदवार होते. मात्र त्यांची खरी लढत राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध होती. आणि ही बाजी धनंजय मुंडे यांनी जिंकली.   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:assembly election results 2019 ncp candidate Dhananjay Munde win against bjp candidate pankaja munde in parali constituency in beed district