पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पृथ्वीराज बाबांनी भाजपचं चक्रव्यूव्ह भेदलं!

पृथ्वीराज चव्हाण

विद्यमान आमदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला गड कायम राखला आहे. भाजपचा डाव हाणून पाडत त्यांनी  विधानसभेतून बाजी मारली. उंडाळकर गट माघार घेईल ही आशा फोल ठरल्यानंतर कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील लढत तिरंगी आणि चुरशीची झाली होती. अत्यंत चुरशीच्या लढतीत मताधिक्क्याचे आव्हान पेलण्याचे टार्गेट कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडी समोर उभे राहिले होते.

१५ अपक्ष आमच्यासोबत: मुख्यमंत्री

मागील निवडणुकीत शिवसेना स्वतंत्र लढल्याने भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांना फटका बसला होता. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. मात्र यंदा उंडाळकर गटाने बंडखोरीचा झेंडा फडकविल्याने राजकीय गुंतागुंत वाढली होती. भाजप-सेना महायुतीमुळे अतुल भोसलेंची ताकद वाढेल आणि त्याचा फटका पृथ्वीराज चव्हाण यांना बसेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. 

राष्ट्रवादीच्या बाल्लेकिल्यात शिवेंद्रराजेंनी फुलवलं कमळ

त्यातच पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून अनेक गट विभक्त झाल्यामुळे आमदार आनंदराव पाटील यांच्यासह, प्रा. मच्छिंद्र सकटे, पालिकेतील राजेंद्र यादव यांचा गट विभक्त झाला होता. अशा स्थितीत रयत संघटनेतर्फे ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची रिंगणातील उमेदवारी कोणाला अडचणीची ठरणार असा प्रश्न निर्माण झाला होता. पृथ्वीराज चव्हाण गटाचे आमदार आनंदराव पाटील भाजपकडे झुकले होते. पालिकेतील यादव गटाने भाजपशी हातमिळवणी केली. बहुतांशी नगरसेवकांना वेगवेगळ्या पातळीवर आपल्या गोटात घेत भाजपने पृथ्वीराज चव्हाण यांच्या भोवती चक्रव्यूव्ह रचले  होते. हे राजकीय चक्रव्यूव्ह भेदण्यात चव्हाण यशस्वी ठरले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:assembly election results 2019 Former Chief Minister of Maharashtra Prithviraj Chavan win Karad south constituency