पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सचिन सावंत यांच्या 'त्या' ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

सचिन सावंत

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 'पुन्हा आणुया आपलं सरकार' म्हणणाऱ्या भाजप-सेना महायुतीला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. याउलट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीनं शतकाकडे वाटचाल केली आहे. दरम्यान भाजपला दूर ठेवणे ही काँग्रेसची प्राथमिकता असेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे. 

उल्लेखनिय आहे की, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस दिसत नाही, असे चित्र पाहायला मिळाले होते. राहुल गांधी यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही बड्या नेत्यांची महाराष्ट्रात सभा झाली नाही. तरीही काँग्रेसला जनतेने बऱ्यापैकी कौल दिल्याचे पाहायला मिळाले. भाजप-शिवसेना महायुतीला सरकार स्थापन करणे फारसे अवघड नाही. पण अपेक्षेपेक्षा भाजपच्या जागा कमी होणे आणि याउलट कमी जागा मिळूनही शिवसेनेची आगेकूच पाहायला मिळणे यामुळे राजकारणाची दिशा बदलणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

धक्कादायकपणे पिछाडीवर असलेले राज्यातील महत्त्वाचे उमेदवार

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे दुपारनंतरच्या कल कोणाकडे झुकणार आणि शरद पवार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.