पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आदित्य ठाकरेंच्या या कृतीकडे लक्ष वेधत शेलारांचा सेनेला टोला

आदित्य ठाकरे

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी आपापल्या १६२ आमदारांच्या उपस्थित ग्रँड हयात हॉटेलमध्ये ओळख परेड घेतली. यावेळी दिग्गज नेत्यांसोबतच नवनिर्वाचित राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि शिवसेनेचे नेते आणि ठाकरे घराण्यातील पहिले आमदार आदित्य ठाकरे यांनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

धनंजय मुंडे म्हणाले की, अजित दादांवरील प्रेम हा वेगळा विषय!

या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नवनिर्वाचित आमदारांची शपथ दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयावर ठाम  राहू अशी शपथ आमदारांकडून दिली. हाच धागा पकडून भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 

सिंचन घोटाळ्यातील ९ फाईल्स क्लोज, पण..

आशिष शेलार म्हणाले की, बाळासाहेबांच्या नातवाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली शपथ घेतली. हा क्षण मराठी माणसाची मान शरमेने खाली झुकावी, असा होता. सत्तासंघर्षात आम्हीच फ्लोअरवर आम्हीच बाजी मारु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेससोबत तडजोड करणाऱ्या शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी हिंदूत्वाचा मुद्दा सोडला, असा अरोप यापूर्वीही भाजपच्या गोटातून करण्यात आला आहे.