पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'विधिमंडळ नेतेपदी जयंत पाटील यांची नियुक्ती अवैध'

जयंत पाटील

भाजपबरोबर जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसने विधिमंडळ नेतेपदावरुन हकालपट्टी केली आहे. त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, भाजपने यावर आक्षेप नोंदवला आहे. जयत पाटील यांची नियुक्ती अवैध असल्याचे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे. 

ते म्हणाले, जयंत पाटील यांची नियुक्ती अवैध आहे, असे आमचे मत आहे. गटनेता बदलायचा असेल तर सर्व आमदारांच्या उपस्थितीत ही निवड व्हायला हवी. पाटील यांच्या नियुक्तीवेळी असे काही झालेले नाही. अजित पवारांच्या निवडीचे पत्र राज्यपालांना देण्यात आलेले आहे. नेता निवड बदलायची असेल तर संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागते. राज्यपालांना याची खात्री करुन द्यावी लागते. 

यावेळी शेलार यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊत यांना २०१९ चा 'कलहकार' पुरस्कार द्यायला हवा, असा टोला त्यांनी लगावला. राऊत कमी बोलले तर महाराष्ट्राचे हित होईल, असेही ते म्हणाले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:appointment of Jayant Patil as a NCP legislative party leader is invalid says BJP leader Ashish Shelar