पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...पण ठरल्याप्रमाणे होऊ द्या! सेना यू टर्न घेण्याचे संकेत

संजय राऊत

भाजप आणि राष्ट्रवादीने विधीमंडळाच्या नेतेपदाची निवड केल्यानंतर गुरुवारी शिवसेनेच्या विधीमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीपूर्वी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सरकार महायुतीचे असावे हीच आमचीही इच्छा आहे, पण सर्व गोष्टी या ठरल्याप्रमाणे व्हायला हव्यात, असे मत त्यांनी व्यक्त केले.  

मुख्यमंत्री कोणाचा असेल? असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणे हे आमचे कर्तव्य आहे. ज्यांच्याकडे बहुमत असेल त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. मॅजिक फिगर १४५ आहे. त्यानुसारच मुख्यमंत्र्यांची निवड होईल. पक्षप्रमुख योग्यवेळी योग्य भूमिका घेतली. प्रसारमाध्यमांनी कोणत्याही पुड्या सोडू नये, असेही राऊत यावेळी म्हणाले. 

 

राष्ट्रवादी विधीमंडळाच्या नेतेपदी अजित पवारांची निवड

भाजपने खाते वाटपासंदर्भात भूमिका घेतली आहे. ती शिवसेनाला मान्य आहे का? यावर आम्ही खाते वही घेऊन बसलो नाहीत. तुम्ही काही बातम्या करता. त्याला पुड्या सोडणे असे म्हणतात. फडणवीसांची भूमिका स्वागतार्ह आहे. तशीच राहायला पाहिजे. सोबत राहण्यात भाजप-शिवसेनेसह राज्यातील जनतेचं हित आहे. पण ठरल्याप्रमाणे घडू दे म्हणजे झाले, अशी आशा संजय राऊत यांनी व्यक्त केली. भाजपच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे सरकारच पुन्हा सत्तारुढ होईल, असे म्हटले होते.    

दिल्लीत आरएसएसची महत्वपूर्ण बैठक; भाजपचे नेते उपस्थित

पक्षप्रमुखांनी मांडलेली भूमिका सर्वोच्च असेल. उद्धव ठाकरे जो काही आदेश देतील त्याप्रमाणे होईल. राज्यातील निकालानंतर भाजपशिवाय शिवसेनेकडे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा पर्याय असल्याची चर्चा रंगत आहे. यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्षाकडून  सरकार स्थापन होईपर्यंत काहीही तर्कवितर्क ऐकायला मिळतील. पण सरकार महायुतीचे असावे ही आमचीही इच्छा आहे.आमदारांच्या बंडखोरीबद्दल ते म्हणाले की, सध्याच्या घडीला राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप किंवा शिवसेना यांच्याकडून निवडून आलेला एकही आमदार फुटेल, असे वाटत नाही.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Anybody who has the majority of 145 be it any politician or MLA can become the Chief Minister of Maharashtra Says Sanjay Raut Shiv Sena