पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने ओबीसींसाठी खूप कामं केली'

अमित शहा

बीड जिल्ह्यातल्या सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. मेळाव्या ठिकाणी अमित शहा पोहचताच ३७० तिरंगी ध्वज दाखवून त्यांचे  स्वागत करण्यात आले. दरम्यान, 'सत्तेमध्ये आल्यापासून मोदी सरकारने वंचितांसाठी खूप कामं केली', असल्याचे अमित शहा यांनी यावेळी सांगितले. तसंच, भाजप नेते स्वर्गिय गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोड कामगारांसाठी संपूर्ण आयुष्य वेचले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

पाकमधून अजून एक ड्रोन पंजाबमध्ये घुसल्याने सुरक्षाव्यवस्था आणखी सतर्क

'५ वर्षापूर्वी दसऱ्याच्या दिवशी मी भगवान गडावर आलो होतो. भगवान बाबांचे हे स्मृतीस्थळ पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी असेल', असे अमित शहा यांनी सांगितले. तसंच भगवान बाबांनी त्यांचे आयुष्य वंचितांसाठी वेचले. शिक्षणाच्या माध्यमातून वंचितांचा विकास होऊ शकतो अशी शिकवण भगवानबाबांनी दिली होती. तसंच त्यांनी शिक्षणाचे विचार लोकांमध्ये रुजवले. गोपीनाथ मुंडे यांनी देखील भगवान बाबांच्या मार्गावर काम केले. ऊसतोड कामगारांसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. पंकजा मुंडेंनी सुध्दा गोपीनाथ मुंडेंच्या पावलावर पाऊल ठेवले,' असल्याचे मत अमित शहांनी व्यक्त केले. 

'मन की बात'चे 'मौन की बात' होऊ देऊ नका, शशी थरूर यांचे मोदींना पत्र

दरम्यान, 'तुम्ही ३०० जागा दिल्या मोदींनी ३७० हटवले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३७० हटवून संपूर्ण देशातील जनतेला राष्ट्रभक्तीने एकत्र आणण्याचे काम केले. ३७० हटवून संपूर्ण देश एक झाला. गेल्या ७० वर्षात आधीच्या सरकारने जी कामं केली नाही ती मोदींनी पूर्ण केली. मोदींच्या नेतृत्वात देशाच्या विकासासाठी भाजप पुढे जात असल्याचे अमित शहांनी सांगितले. तसंच मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून वंचित, ओबीसीच्या विकासासाठी खूप कामं केली. मोदींनी ओबीसींना संवैधानिक मान्यता मिळवून दिली असल्याचे मत अमित शहांनी व्यक्त केले आहे. 

गांधी कुटुंबाच्या सुरक्षेवरून गोंधळ, SPG सुरक्षा काढण्याची चर्चा