पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेचा मुख्यमंत्री... आदित्य ठाकरे यांची उमेदवारी... आणि उद्धव ठाकरेंची भूमिका

महायुतीच्या पत्रकार परिषदेत उदधव ठाकरे, आदित्य आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून केले गेले होते. त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी वरळीमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे कार्यकर्त्यांना अधिक जोश आला. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी महायुतीच्या पत्रकार परिषदेत, निवडणुकीच्या रिंगणात उतरणे म्हणजे लगेचच मुख्यमंत्री होणे, असा अर्थ काढू नये, असे म्हटले आहे. त्यामुळे तूर्ततरी आदित्य ठाकरे लगेचच मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता नाही, असे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे.

आरे कॉलनीत मध्यरात्री राडा, झाडे तोडण्यावरून आंदोलक संतप्त

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खुद्द आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुकीच्या राजकारणात पहिले पाऊल टाकणे याचा अर्थ लगेचच राज्याचा मुख्यमंत्री होणे असा होत नाही. आदित्य ठाकरे आता केवळ निवडणुकीला उभा राहिला आहे. त्याची ही सुरुवात आहे. 

भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून आधीच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाली आहे. यावेळी ते म्हणाले, आदित्य ठाकरे या निवडणुकीत मुंबईत सर्वाधिक मताधिक्याने विजयी होतील, असा मला विश्वास आहे. आम्हाला त्याला घेऊन विधानसभेमध्ये काम करायचे आहे. या निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकही FIR नाही

आदित्य ठाकरे यांनी गुरुवारीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणुकीच्या प्रक्रियेत उतरणारा आदित्य हा ठाकरे कुटुंबातील पहिलाच सदस्य आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. निवडणुकीचा अर्ज दाखल केल्यानंतर आपण कोणत्याही पदासाठी निवडणुकीला उभे राहिलो नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले होते.