पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नुसती युती नव्हे महायुती! पण.. फॉर्म्युला अद्यापही गुलदस्त्यातच

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना आपल्या अन्य मित्रपक्षासह महायुतीच्या माध्यमातून मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका पत्रकाद्वारे ही घोषणा करण्यात आली आहे. निवडणुका लागल्यापासून युतीच काय होणार? याबाबत चर्चा रंगली होती. अखेर युती होणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मित्रपक्षांतील केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महादेव जाणकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत यांच्यासोबतच्या चर्चेअंती महाराष्ट्राच्या अगामी निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचा उल्लेख प्रसिद्धी पत्रकात करण्यात आला आहे.  

सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करु: अजित पवार

युतीची घोषणा झाली असली तरी जागावाटपासंदर्भातील संभ्रम अद्यापही कायम आहे. भाजप-सेना किती जागेवर लढणार आणि मित्रपक्षांना किती जागा सोडणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असल्यामुळे फॉर्म्युला गुलदस्त्यात ठेवण्यात आला असून संयुक्त पत्रकार परिषदेशिवाय पत्रकाच्या माध्यमातून महायुतीची घोषणा करण्यात आल्याचे दिसत आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Alliance between Shiv Sena BJP and other allies for the Maharashtra Assembly elections announced officially Seat sharing to be announced soon