पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजित पवारांनी चूक मान्य करावीः नवाब मलिक

नवाब मलिक (HT Photo by Kunal Patil)

अजित पवार यांनी चूक केली आहे. शनिवारी सायंकाळपासून आम्ही त्यांना समजाऊन सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांनी अजूनही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. त्यांनी त्यांची चूक मान्य करावी, हेच त्यांच्यासाठी चांगले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.

ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस सभागृहात बहुमत सिद्ध करु शकणार नाहीत. त्यांनी आधीच राजीनामा द्यावा अशी मागणी करत सायंकाळपर्यंत आमचे सर्व आमदार परत येतील, असा दावाही त्यांनी केला.

भाजपने राष्ट्रपती, राजभवनाचा काळाबाजार केला, राऊत यांचा आरोप

दरम्यान, गेल्या दहा दिवसांत जे पक्ष आपला किमान समान कार्यक्रम निश्चित करू शकले नाहीत. ते दहा मिनिटांत आपले सर्व आमदार राज्यपालांपुढे कसे काय सादर करू शकणार होते, असा प्रश्न भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी रविवारी उपस्थित केला. शनिवारपासून राज्यात सुरू असलेल्या वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. कालही आशिष शेलार यांनी अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ गटनेते पदावरून हटविण्याचा पक्षाचा निर्णय बेकायदा असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर जयंत पाटील यांची या पदावर करण्यात आलेली निवडही चुकीची असल्याचे म्हटले होते.

'विधिमंडळ नेतेपदी जयंत पाटील यांची नियुक्ती अवैध'