पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपच्या मंत्र्यानेच 'चंपा' शब्द तयार केला, अजित पवारांचा गौप्यस्फोट

अजित पवार, चंद्रकांत पाटील

आपण एकदा भाजपच्या एका कॅबिनेट मंत्र्यांना भेटायला गेलो होतो, त्यावेळी त्यांनीच चंद्रकांत पाटील यांच्या नावावरून 'चंपा' असा शब्द उच्चारला होता. या मंत्र्यांचे नाव मी निवडणुकीनंतर सांगेन, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले. शनिवारी पत्रकार परिषदेत त्यांनी हा गौप्यस्फोट केला.

काँग्रेसच्या प्रचारातून आक्रमकपणा 'गायब', नेत्यांची पाठ

अजित पवार म्हणाले, मी एका कामासाठी भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी आम्ही बोलत असताना त्या मंत्र्यांकडून चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख करताना चंपा असे म्हणण्यात आले. मी निवडणुकीनंतर हे मंत्री कोण होते, त्यांचे नाव सांगेन. पण हा शब्द मी तयार केलेला नाही. चंद्रकांत पाटील यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनीच तयार केला असल्याचे त्यांनी सांगितले.   

कॅरीबॅगसाठी १८ रुपये घेतल्याने बिग बाजारला ११ हजारांचा दंड

चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरुद्ध प्रचार करताना अजित पवार यांनी त्यांचा उल्लेख चंपा असा केला होता. त्यानंतर त्यांनी हा खुलासा केला.