आमचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांचा फोन आला. त्यांनी आम्हाला बोलावले आणि काँग्रेस-शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर सरकार स्थापन करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही राजभवनात शपथविधीला गेलो, अशी माहिती गेल्या दोन दिवसांपासून गायब असलेले राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील आणि दौलत दरोडा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. हे दोघेही प्रथमच माध्यमांसमोर आली होते.
तत्त्पूर्वी, आमदार दौलत दरोडा यांनी आपण सुखरुप असून आपली काळजी करु नका. आम्ही शरद पवार यांच्याबरोबर असल्याचे कळवले होते. दरोडा यांच्या मुलाने बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती.
Anil Patil, NCP MLA who was reportedly missing & brought to Mumbai from Delhi by NCP leaders today: We told Sharad Pawar sa'ab that we want to return & stay with the party, he assured us that we will be brought back and made the necessary arrangements. (2/2) #Maharashtra https://t.co/JZfdhzSKoG
— ANI (@ANI) November 25, 2019
आता सुप्रीम कोर्टाचे उद्यापर्यंत 'वेट अँड वॉच'
आमदार दरोडा म्हणाले की, आम्ही दोन दिवसांपासून गायब असल्याच्या अफवा येत होत्या. पण त्या अफवा खऱ्या नव्हत्या. आम्ही शरद पवार यांच्यासोबतच आहोत. गटनेते अजित पवार यांचा फोन आल्यानंतर आम्ही तेथे गेलो. त्यांनी भाजपबरोबर आघाडी करत राष्ट्रवादी सरकार स्थापन करत असल्याचे सांगितले.
संध्याकाळी आम्हाला सर्व प्रकार समजला. त्यानंतर आम्ही शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या संपर्कात होतो. आम्ही तिथे सुरक्षित होतो, असेही ते म्हणाले.
... या मागे माझा हात असल्याचे म्हणणे चुकीचे - शरद पवार
अनिल पाटील म्हणाले की, आमच्यावर फुटीरवादी आमदार असल्याचा आरोप होत आहे. अजित पवार हे आमचे नेते असल्याने आणि त्यांनी बोलावल्यामुळे आम्ही तिथे गेलो. स्थिर सरकार स्थापन करायचे असल्यामुळे राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. बाकीचे आमदार नंतर येतील, आपण निघायचे आहे असे ते म्हणाले. सांयकाळी शरद पवार यांच्याशी संपर्क झाला. त्यावेळी त्यांनी आपण काँग्रेस-शिवसेनेसोबतच असणार असल्याचे सांगितले.
राज्यसभेतील मार्शल पुन्हा आपल्या जुन्या गणवेशात
आम्ही जिथे होतो ती जागा सुरक्षित होती. पण तिथे पोलिस, साध्या वेशातील पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. भाजपचे कार्यकर्तेही मोठ्याप्रमाणात होते. शरद पवार यांनी आम्हाला तेथून सोडवून आणले.